माणिकवाडी (ता. वाळवा) : येथे रोजगार हमी योजनेतील महादेव खोत यांचे घरापासून दिनकर शिंदे यांचे घरापर्यंत कॉक्रीटीकरण करणे या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ फोडून व कुदळ मारुन केला.
- Mansing Naik
- Mar 18, 2024
- 1 min read

माणिकवाडी (ता. वाळवा) : येथे रोजगार हमी योजनेतील महादेव खोत यांचे घरापासून दिनकर शिंदे यांचे घरापर्यंत कॉक्रीटीकरण करणे या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ फोडून व कुदळ मारुन केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक संजय शिंदे, सरपंच वसंत शिंदे, उपसरपंच शैलेश पाटील, अजित खोत, माजी सरपंच अमोल गुरव व शंकर खोत, सोसायटी अध्यक्ष शंकर जाधव, जोतिर्लिंग सोसायटीचे अध्यक्ष दिनकर शिंदे, दूध संस्थेचे संचालक विलास खोत, ग्रामपंचायत सदस्य हणमंत भुरे व ललीता मदणे, ग्रामसेवक पुनम पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पवार व माजी अध्यक्ष विलास खोत आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments