मुंबई : आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने राज्यातील सुरक्षा रक्षकांची 1989 पासूनची पोशाख बदलण्याची मागणीबाबत मुंबईतील मंत्रालयात कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 2 min read



मुंबई : आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने राज्यातील सुरक्षा रक्षकांची 1989 पासूनची पोशाख बदलण्याची मागणीबाबत मुंबईतील मंत्रालयात कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत १९८१ ते ८७ दरम्यान मान्यताप्राप्त खासगी सुरक्षा रक्षक संघटनांना खाकी पोशाख दिला जात होता. १९८८ पासून सुरक्षा रक्षक मंडळ निळा रंगाचा पोशाख देत आहे हा पोशाख रद्द करून पूर्वीप्रमाणे खाकी रंगाचा पोशाख मिळावा ही प्रमुख मागणी महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक संघटनांची होती. याबाबत राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्ष अश्विनी सोनवणे यांच्या पुढाकाराने उपोषण करण्यात आले होते. सुरक्षा रक्षक संघटनांनी माथाडी भवन येथे ७ जुलै रोजी झालेल्या शिराळा मतदार संघातील मुंबई स्थित रहिवाशांच्या मेळाव्यात सुरक्षा रक्षक संघटनांनी आमदार मानसिंगभाऊ यांना भेटून मागणीचा विषय समजावून सांगितला होता व त्याबाबत निवेदन दिले होते. त्यावरून कामगार मंत्री ना. खाडे यांना पत्र पाठवून याचा पाठपुरावा केला होता. आज (ता. २३) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार मानसिंगभाऊ यांनी मंत्री महोदयांना अनेक वर्षापासून असलेली मागणी समजावून सांगितली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मंत्री महोदयांनी सर्व सुरक्षा राक्षकांसाठी "कोबरा कमांडो" या रंगाचा पोशाख निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. मात्र हा रंग सशस्त्र दले व पोलीस दलाच्या पोशाखाशी मिळता जुळता होणार नाही, याची खबरदारी घेतली जावी. सुरक्षा रक्षकांना देण्यात येणारा पोशाखाचा रंग व सुचविलेले कापडाचा रंग चांगला असेल. त्याबाबत देण्यात आलेले नमुने गृह विभागाला पाठून त्यास संमती घेण्यात येईल. त्यानंतर पोशाख निश्चित करण्यात येईल. असे मंत्री ना. खाडे यांनी सांगितले. बैठकीला आमदार मानसिंगराव नाईक, प्रधान सचिव (कामगार) विनिता वेध सिंगल, महाराष्ट्र शासन (कामगार) आवर सचिव दिलीप वनी रे, कामगार आयुक्त तूमोड साहेब, सह आयुक्त (कामगार) लोखंडे मॅडम, मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब यांच्यासह राज्यातील २२ सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री. मानसिंगभाऊ यांचे केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.



Comments