मुंबई : येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई अंर्तगत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून अभिसरण उपक्रम राबविण्यात येतो.
- Mansing Naik
- Aug 28, 2024
- 1 min read

मुंबई : येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई अंर्तगत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून अभिसरण उपक्रम राबविण्यात येतो. या अभ्यास दौऱ्यासाठी शिराळा तालुक्यात आलेल्या युवकांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांची चिखली येथे भेट घेतली. या उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र समजून घेताना उत्तर महाराष्ट्रातील मुले पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आली आहेत. या दौऱ्यात कृषी, औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, भैगोलिक परिस्थितीचा आढवा घेतील. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यसाठी दहा प्रमाणे पन्नास विद्यार्थी आहेत. ते दररोज एका तालुक्याचा अभ्यास करणार आहेत. काल (ता. 26) त्यांनी शिराळा तालुक्याला भेट दिली. आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांची भेट घेवून त्यांनी विराज इंडस्ट्रिजला भेट दिली. येथे त्यांनी धान्यापासून अल्कोहोल कसे तयार होते. ‘‘वेस्ट’’ मधून पशुखाद्य कसे तयार केले जाते, यांची माहिती घेतली. त्यानंतर ते चांदोली अभयारण्यालगत असलेल्या विस्थापीत धनगरवाडा गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले व चांदोली धरणाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी तालुक्याच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, कृषी उत्पादन, व्यवसाय, उद्योग यांचा आढावा घेतला. या अभ्यास दैऱ्यात प्रदिप मोहिते, सिध्देश कदम, मयुर पांडुळे, धनेश धोबी, मिलिंद पाटील, सुरज सोनवणे, गीतांजली निकुंभे, हर्षदा निझारे, ममता भिलमल यांचा समावेश होता.



Comments