राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना स्थळावरील लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास त्यांच्या जयंतीनिमित्त मी व माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी अभिवादन केले.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


साखराळे (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना स्थळावरील लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास त्यांच्या जयंतीनिमित्त मी व माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी अभिवादन केले. यानिमित्ताने स्व. बापूंनी केलेले शेती, सहकार, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील आदर्शवत व ठोस कार्याचे स्मरण केले. यावेळी सोबत राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक बंडोपंत नांगरे, बाजार समितीचे माजी संचालक तानाजीराव मोरे, दिलीपराव खांबे, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक के. के. पाटील, माजी सरपंच सर्जेराव शेळके व शहाजी पाटील, सी. एच. पाटील, संजय पाटील, शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयराव महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.



Comments