रेठरे धरण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व माझ्या हस्ते 3.81 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले.
- Mansing Naik
- Jan 30, 2024
- 1 min read
रेठरे धरण (ता. वाळवा) : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व माझ्या हस्ते 3.81 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 2 कोटी 60 लाख खर्चाच्या पाणी योजना व आमदार अरुणआण्णा लाड यांच्या निधीतून 15 लाख खर्चाची अभ्यासिकेचे भूमिपूजन तर, माजी जि. प. सदस्या संध्याताई पाटील यांच्या निधीतून 86 लाख खर्च करून मॉडेल स्कूलच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या शाळा 9 खोल्या व अंगणवाडी, 20 लाख खर्चाच्या कै. आनंदराव पाटील कुस्ती आखाडा व राजारामबापू पाटील वाचनालयाचे उद्घाटन अशा कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील, माजी राज्यमंत्री श्री. नाईक व मी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, नेर्ले सरपंच संजय पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, संचालक अतुल पाटील, सरपंच हर्षवर्धन पाटील, सुरूलच्या माजी सरपंच कुंदाताई पाटील, सरपंच शंकर चव्हाण, इस्लामपूर राष्ट्रवादी अध्यक्ष शहाजी पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, मंजूषा पाटील, बंडा नांगरे, उपसरपंच शंकर पवार, माजी प. स. सदस्य शामराव पाटील, विजयसिंह देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष मोहन पाटील, योगेश पाटील, माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, संदेश पाटील, माजी उपसरपंच भीमराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय वाघमारे, यशवंत वाघमारे व योगेश राऊत, विजय मुळीक, सागर पाटील, उमेश बनसोडे, किरण नांगरे, दीपक, रविंद्र, जयवंत, अशोक, सागर, अनिल, तानाजी, शहाजीराव, राजू , ओमकार व सुरेश पाटील, अभिजित व मनोज घाटके, गणेश शेवाळे, विश्वास धुमाळ आदी उपस्थित होते.







Comments