वाकुर्डे बुद्रुक : शिराळा तालुक्यात मी व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत संयुक्त संपर्क दौरा सुरू आहे.
- Mansing Naik
- Aug 7, 2024
- 1 min read

वाकुर्डे बुद्रुक : शिराळा तालुक्यात मी व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत संयुक्त संपर्क दौरा सुरू आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक, तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी व बाजार समितीचे उपसभापती विजय महाडीक सहभागी आहेत. वाकुर्डे बुद्रुक येथे पार पडलेल्या बैठकीत पडळवाडी, मानेवाडी, बादेवाडी, मादळगाव, झोळेवाडी येथील कार्यकर्त्यांचा समावेश होता. बैठकीत आमदार श्री. मानसिंगभाऊ यांच्यासह यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री. नाईक, तालुकाध्यक्ष श्री. नायकवडी, युवकचे जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच संभाजी पाटील, तानाजी पाटील, सोसायटीचे अध्यक्ष तानाजी तरसे, सोसायटीचे अध्यक्ष तानाजी माने, सदस्य बापू सकटे व बापू माने, संचालक नामदेव पडवळ, रामचंद्र गुरव, शामराव पाटील, जगन्नाथ सोनवणे, आनंदा थोरात, सागर माने, आनंदा कांबळे, सदाशिव शिंदे, अजय पाटील, संदीप जाधव, माजी पोलिस पाटील नामदेव मादळे, अजय पाटील, विजय जाधव, सागर पळशे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments