वाटेगाव (ता. वाळवा) येथे आज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


वाटेगाव (ता. वाळवा) येथे आज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दीनदुबळ्यांचा, गिरणी कामगारांचा, शोषितांचा, शेतकरी व शेतमजूर तसेच महिलांच्या वेदना व दु:ख अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून मांडले. समाजाला जागृत करण्याचे काम केले. त्यांच्या स्मृति व कार्याचे यानिमित्ताने स्मरण केले. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच नंदाताई चौगुले, माजी सरपंच प्रकाश पाटील, डॉ. भूषण चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सुनील खराडे, योगेश साठे, आनंदराव धुमाळ, वंदना सावंत, पुष्पा मुळीक, प्रतिभा देसाई, दिनकर देसाई, डॉ. शिंदे, वाटेगाव ग्रामसेवक शुभांगी भारती व गजानन धस्के आदी मान्यवर उपस्थित होते.



Comments