वाटेगाव : सरपंच सेवा संघामार्फत दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार वाटेगावच्या सरपंच नंदाताई कीर्तिकुमार चौगुले यांना मिळाला आहे.
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 1 min read

वाटेगाव : सरपंच सेवा संघामार्फत दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार वाटेगावच्या सरपंच नंदाताई कीर्तिकुमार चौगुले यांना मिळाला आहे. संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात तो देण्यात आला. यानिमित्त सरपंच नंदाताई चौगुले यांचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, वाटेगाव संयुक्त पाणी योजना संचालक प्रदीप चव्हाण, सोसायटीचे संचालक अरुण बर्डे व योगेश पाटील, कीर्तिकुमार चौगुले, शुभम पाटील आदी उपस्थित होते.



Comments