top of page
Search

शिरसटवाडीतील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 24, 2024
  • 1 min read

शिरसटवाडी (ता. शिराळा) येथील भाजपच्या (सत्यजित देशमुख गट) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. सर्वांचे स्वागत व सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांच्या हस्ते झाला. शिरसटवाडी झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजू पाटील यांनी केले. यावेळी भाजपमधून शिरसटवाडी माजी सरपंच मारुती खटींग, माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खटींग व बबन खटींग, विक्रम खटींग, अक्षय खटींग, शिवाजी शिरसट, वसंत शिरसट, वाल्मीक कृष्णा शिरसट, दशरथ कृष्णा शिरसट, खाशाबा कृष्णा शिरसट, भगवान कृष्णा शिरसट, कृष्णा शिरसट, रघुनाथ शिरसट, शंकर बागट, सुभाष वारके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार मानसिंगभाऊ व अध्यक्ष रणधीर नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सावंतवाडीचे माजी सरपंच संपत कडवेकर, मेणीचे माजी सरपंच संजय बेंगडे व आनंदा सुतार, रांजणवाडीचे माजी सरपंच बाबासो बेंगडे, सोसायटीचे उपाध्यक्ष शामराव पाटील, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाच्या संचालक मंगल पाटील, माजी सरपंच मधुकर शिरसट, विकास आटुगडे, बाबूराव आस्कट, सदाशिव खटींग, उत्तम, धोंडिराम, नारायण व धनाजी शिरसट, आनंदा खटींग, ग्रामपंचायत सदस्य जयश्री शिरसट, कमल शिरसट व कृष्णा शिरसट आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच धोंडिराम शिरसट यांनी आभार मानले.

--

भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेश

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page