शिराळा : आज येथील तहसील कार्यालयात तालुक्यात पूरहाणीत झालेल्या नुकसानीबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
- Mansing Naik
- Aug 7, 2024
- 1 min read


शिराळा : आज येथील तहसील कार्यालयात तालुक्यात पूरहाणीत झालेल्या नुकसानीबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत-पाटील, गट विकास अधिकारी संतोष राऊत, तालुका कृषी अधिकारी अरविंद शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी मी म्हणालो, 18 ते 20 ऑगस्ट पर्यंत नुकसानीचे पंचनामे पुर्ण करावे. त्यापूर्वी गावात दवंडी द्यावी. किती तारखेला पंचनामा होणार याचे गावात फलक लावावा. ‘सोशल मिडिया’वर गावातील ग्रुपवर संदेश पाठवावा. पंचनामा करताना त्या शेतकऱ्यास बोलावून द्यावे. प्रामुख्याने ऊस, सोयाबीन व भुईमूग शेतीला पूराचा, अति पावसाचा मोठा फटका बसला आहे. सलग दोन वर्षे शेतीचे मोठे नुकसान होत आले आहे. बँक खात्याची ‘के.वाय.सी’ व खात्याला जोडलेला असलेला शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक घ्या. मयत खातेदारांची माहिती घ्या व तेथे सबंधीत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती अद्यावत करा. म्हणजे शासनाकडून येणारी नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. संवेदनशील व जागृत राहून तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत. प्रारंभी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यालयामार्फत मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला. यावेळी महसूल पंधरवडा युवासंवाद निमित्ताने विविध दाखल्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार खोत-पाटील यांनी आभार मानले.



Comments