शिराळा : बदलापूर येथे अल्पवयीन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शिराळा येथील मरिमाई चौकात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले.
- Mansing Naik
- Aug 24, 2024
- 1 min read

शिराळा : बदलापूर येथे अल्पवयीन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शिराळा येथील मरिमाई चौकात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. माझ्यासह यशवंत ग्लुकोजचे कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदविला. पोलिस यंत्रणेने गुन्हा नोंद करून घेण्यास विलंब लावला, मुख्यमंत्र्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हटले, या बाबींचा निषेध नोंदविला. गृहमंत्र्यांनी या घटनेची यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. आदी याबाबत तोंडास काळ्या फिती बांधून सकाळी दहा वाजता सर्व मंडळी मरिमाई चौकात बसली होती. आंदोलनाच्या सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष बी. के. नायकवडी, ‘विश्वास’चे संचालक विजयराव नलवडे व विश्वास कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम व प्रवीण शेटे, शिराळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील कवठेकर, अजय जाधव, माजी नगरसेवक बंडा डांगे व संजय हिरवडेकर, यशवंत दुधचे संचालक उत्तम निकम, माजी सरपंच गजानन सोनटक्के, माजी उपसरपंच संभाजी गायकवाड व बाबा कदम, बाजार समितीचे संचालक वासीम मोमीन, सुनील तांदळे, बिऊरचे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी अंबामाता सोसायटीचे अध्यक्ष प्रताप मुळीक, प्रदीप कदम, महादेव डांगे, बसवेश्वर शेटे, अशोक यादव, संतोष गायकवाड, वैभव कांबळे, तुषार यादव, अतुल कोतवाल, संदीप दिवटे, मकरंद उबाळे, महंमद पठाण, अविनाश कांबळे आदी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments