top of page
Search

शिराळा: महिला सशक्तीकरणासाठी प्रेरणादायी प्रदर्शन आणि मेळावा

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Feb 20, 2024
  • 1 min read

Mansing Bhau
Mansing Bhau

शिराळा : येथे महिला बचत गटाने तयार केलेली उत्पादने व साहीत्यांचे प्रदर्शन व महिला मेळाव्याचे उद्धघाटन माझ्या हस्ते झाले. येथील बस स्थानकाच्या आवारात महिला आर्थिक विकास महामंडळ (सांगली) व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प यांच्या मार्फत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अंतर्गत हे प्रदर्शन १७ ते २० फेब्रुवारी अखेर सुरू राहणार आहे.

उद्धघाटनानंतर मिबउपस्थित बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. मी म्हणालो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महिला विकास आर्थिक विकास महामंडळाशी करार केला आहे. याशिवाय बँक आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्गीय व ओ.बी.सी. विकास महामंडळाशी आम्ही करार करत आहे. ज्याचा उद्देश बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण करणे हाच आहे. त्यासाठी बँकेने विविध योजना तयार केलेल्या आहेत. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे, डी. सि. ओ. कुंदन शिनगारे, मा. कुलकर्णी, स्वाती पाटील, संगीता स्वामी, छाया कांबळे, तेजस्विनी पारसी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टी. डी. ओ. प्रकाश शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


Mansing Bhau
Mansing Bhau

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page