top of page
Search

शिराळा : येथील तहसील कार्यालयात मेणी फाटा ते कोकरूड दरम्यानच्या मार्गावर गतीरोधकासह असणाऱ्या विविध मागण्याबाबत बैठक झाली.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Aug 21, 2024
  • 1 min read


शिराळा : येथील तहसील कार्यालयात मेणी फाटा ते कोकरूड दरम्यानच्या मार्गावर गतीरोधकासह असणाऱ्या  विविध मागण्याबाबत बैठक झाली.

शिराळा : येथील तहसील कार्यालयात मेणी फाटा ते कोकरूड दरम्यानच्या मार्गावर गतीरोधकासह असणाऱ्या विविध मागण्याबाबत बैठक झाली. बैठकीस तहसीलदार शामला खोत-पाटील, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक, मार्ग प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता निखिल ढेरे व मेणी फाटा ते कोकरूड दरम्यानच्या अंतरात येणाऱ्या गावचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. चर्चेअंती मेणी फाटा ते कोकरूड दरम्यानच्या मार्गावर गावापुढे व मागे रबलर स्ट्रीप बसविणे, ज्या ठिकाणी धोकादायक वळणे आहेत, त्या ठिकाणी उपाय योजना करणे, ज्या ठिकाणी गटर मधून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, तेथे निचरा करणे यासह मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे संभाव्य होणारे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. बैठकीस फत्तेसिंगराव नाईक आप्पा दूध संघाचे संचालक सुरेश चिंचोलीकर, येळापूरचे सरपंच डॉ. तानाजी पाटील, उपसरपंच किसन आटुगडे, रिळेचे सरपंच बाजीराव पाटील, अशोक डिगे, पांडुरंग गायकवाड, दिनकर दिंडे, कुलदीप जाधव चिंचोली, खिरवडेचे सरपंच प्रमोद पाटील, धनाजी सावंत खुजगाव, शिरसटवाडीचे सरपंच धोंडिराम शिरसट, गिरजवडेचे सरपंच सचिन देसाई, भटवाडीचे उपसरपंच सचिन गायकवाड, शंकर बोरगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page