top of page
Search

शिराळा : येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यांसाठी एकूण खर्च 25 कोटी रुपये येणार आहे.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Mar 18, 2024
  • 1 min read




शिराळा : येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यांसाठी एकूण खर्च 25 कोटी रुपये येणार आहे. त्यासाठी मी दोनच दिवसापूर्वी 13.50 कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उरर्वरीत रक्कमेसाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यादृष्टीने आज किल्ल्याची पाहणी केली. नगरपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यावेळी सोबत होते. त्यांना स्मारक उभारण्यासंदर्भात सूचना दिल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक, कार्यकारी अधिकारी नितीन गाढवे, विश्वासचे संचालक विजयराव नलवडे, विश्वास कदम व यशवंत निकम, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विशाल सुतार व संदीप मिसाळ, किर्तीकुमार पाटील, सुनील कवठेकर, संजय जाधव, बंडा डांगे, बसवेश्वर शेटे, अजय जाधव, ॲड. नरेंद्र सूर्यवंशी, गौतम पोटे, शिवाजी शिंदे, बजरंग कुरणे, प्रदिप कदम, उदय गायकवाड, भगवान लोहार, नतेश यादव, वैभव कांबळे, प्रताप यादव, सुनील पवार, संजय कदम, रमेश यादव, शिराळा तालुका वडार संघटना अध्यक्ष अक्षय नलवडे, रवी पाटील, लालासाहेब शिंदे, शिवकुमार आवटे, मेहबुब मुल्ला, संजय हिरवडेकर, प्रदीप यादव, प्रवीण सवाराम, अमित गायकवाड, सागर नलवडे, महादेव डांगे सचिन मुळे संतोष देशपांडे, सुमित निकम, रमेश कांबळे, राहुल निकम, प्रकाश शिंदे, संजय सुतार,संतोष कदम वासिम मोमीन, अतुल कोतवाल, अनिकेत कुंभार, अजय सोळवंडे उत्तम पाटील, अमोल सावंत, अमोल गोसावी सुनील पवार, दीपक शिंदे, अविनाश कांबळे, रणजीत नलवडे, अमित कांबळे, सुनील तांदळे,, सरोज मुल्ला, दीपक पिसाळ, गजानन सोनटक्के, सोहेल मुल्ला, यांच्यासह अनेक मान्यवर, युवक व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी ॲड. सुधिर पाटील यांची शासनाने नोटरी म्हणून निवड केल्याबद्दल तर अंजली संजय सुतार हीची कोल्हापूर विभागात वनरक्षकपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगच्छ देवून सत्कार केला.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page