शिराळा : येथील बिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन केले.
- Mansing Naik
- Mar 18, 2024
- 1 min read

शिराळा : येथील बिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थितीत होते. या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना म्हणालो, शिराळा येथील बिरोबा मंदिर हे धनगर समाजासह सर्वांचे श्रद्धास्थान आहे. येथे तालुक्यातून व तालुक्याबाहेरून भाविक, भक्त मोठ्या प्रमाणावर येतात. शिराळ्यातील नागरिक येथे असणाऱ्या डोहात पोहायला येतात. येथील परिसर नीट नेटका व सुशोभित असावा म्हणून 20 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातूनही काही कामे राहिल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कार्यक्रमास विश्वासचे संचालक विजयराव नलवडे, विश्वास कदम, बिरुदेव आमरे व यशवंत निकम, बिऊर गावच्या सरपंच स्वाती राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, एस. वाय. यमगर, आनंदराव गावडे, भीमराव ताटे, मारुती बंडगर, संदीप तिवले, सागर माने, सुनील तांदळे, तुकाराम तांदळे, तेजस गावडे, पोपट तांदळे, विश्राम गावडे, दादा बंडगर, जयसिंग पवार,सुनिल पवार, संजय जाधव, अमित गायकवाड, गौतम पोटे, बंडा डांगे, संजय हिरवडेकर, अजय जाधव, विजय शिंदे, शिवाजी शिंदे, रमेश कांबळे, रवी पाटील, विनोद निकम सागर नलवडे, महादेव डांगे, संतोष देशपांडे आदी मान्यवर व धनगर समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभागात स्थापत्य सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाल्यबद्दल भाग्यश्री संजय गावडे हीचा मी सत्कार केला.



Comments