top of page
Search

शिराळा : येथील बिरोबा मंदिर येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचा सांगली जिल्ह्यातील शुभारंभ झाला.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Aug 20, 2024
  • 1 min read

बिरोबा मंदिर

शिराळा : येथील बिरोबा मंदिर येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचा सांगली जिल्ह्यातील शुभारंभ झाला. त्या ठिकाणी मी, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चिमणभाऊ डांगे, धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी धनगर समाजाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगभाऊ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. ही यात्रा 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान सांगली जिल्ह्यातील प्रमुख गावातून जाणार आहे. यात्रेचा समारोप सांगली येथे होणार आहेत. या कार्यक्रमास विश्वासचे संचालक बिरुदेव आमरे व विश्वास कदम, सुखदेव पाटील, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वगरे, राज्य धनगर समाज सांस्कृतिक विभागाचे प्रा. अरुण घोडके, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगिताताई खोत, नगरसेवक कल्पना कोळेकर, वाळवा तालुकाध्यक्ष अविनाश खरात, सुनील मलगुंडे, नाईक दूध संघाचे संचालक एस. वाय. यमगर, संभाजी कचरे, सर्जेराव टकले, रमेश हाके, आनंदराव गावडे, सुनील तांदळे, आबा गावडे, दत्ता मगदूम, रघुनाथ बंडगर, सरपंच श्री. ताटे, डॉ. श्री. यमगर, शिवसेनेचे सागर मलगुंडे, कुंडलिक येडगे, विलास काळबाग, संजय हिरवडेकर, गजानन सोनटक्के आदी मान्यवर व धनगर समाजाचे बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page