शिराळा : येथे आज (ता. 27) तालुक्यातील महिला सरपंच, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणारे आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र व उमेद अभियान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांचा
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


शिराळा : येथे आज (ता. 27) तालुक्यातील महिला सरपंच, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणारे आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र व उमेद अभियान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याचे आयोजित शिराळा सखी मंच मार्फत करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते स्नेह मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक होते. डॉ. जयानंद नलवडे प्रमुख मार्गदर्शक होते. सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अध्यक्ष सुश्मिता जाधव प्रमुख उपस्थित होत्या. सुरवातीस राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रेश्मा लोहार, कोमल मस्कर, आपला बझारच्या अध्यक्ष सौ. नाईक, जिल्हाअध्यक्ष सौ. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित महिलांनी प्रमुख मार्गदर्शन डॉ. नलवडे यांनी केले. अध्यक्षीय मनोगत आमदार श्री. मानसिंगभाऊ यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच सोनाली नायकवडी (चरण), अस्मिता पाटील (सागाव), कोमल मस्कर (कुसळेवाडी), रेश्मा लोहार (काळुंद्रे), शोभा बोरगे (वाकाईवाडी), शीतल पाटील (वाकुर्डे खुर्द), सुवर्णा पाटील (बिऊर), शुभांगी कुरणे (चिखली), वैष्णवी खोत (लादेवाडी), तसेच माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, रंजना पाटील, अर्चना कदम, डॉ. मिनाक्षी पाटील, ॲड. नेहा सूर्यवंशी, वैशाली कदम, कल्पना गायकवाड, रेश्मा खांडेकर, रूपाली पाटील, वंदना यादव, विजया माने, मीनाताई बेंद्रे, गौरी साळुंखे, वैशाली भुयेकर आदी मान्यवर व मोठ्या संखेने महिला उपस्थित होत्या. शुभांगी देसाई यांनी आभार मानले.



Comments