शिराळा येथे ‘‘हटके वडा’’ शाखेचे उद्घाटन
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 1 min read

शिराळा : येथे आज (ता. ४) शुभम पवार व सौरभ पवार यांच्या ‘‘हटके वडा’’ शाखेचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विराज नाईक यांनी फीत कापून केले. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांचा पवार बंधू यांच्याकडून सत्कार करण्यात आला. माणिकवाडीचे सरपंच वसंत शिंदे-पाटील, रमेश पवार, स्वप्नील शिंदे-पाटील, श्रीशैल्य शिंदे- पाटील, अजय खोत, प्रल्हाद शिंदे, राजकिरण शिंदे, अक्षय शिंदे, गणेश आटकेकर, अनिकेत पाटील, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते.



Comments