सांगली : येथे मांगले (ता. शिराळा) येथील मातंग समाजाच्या शेतजमिनीवर वन विभागाचा अन्यायकारक बेकायदेशीर ताबा घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे.
- Mansing Naik
- Jan 30, 2024
- 1 min read
सांगली : येथे मांगले (ता. शिराळा) येथील मातंग समाजाच्या शेतजमिनीवर वन विभागाचा अन्यायकारक बेकायदेशीर ताबा घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. मांगले येथील मातंग समाज शेतजमीन सर्व्हेक्षण क्रमांक 540 मधील 145 एकर 26 गुंठे क्षेत्रावर राज्य सरकारच्या वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता. जमिनीचा ताबा घेतला आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलकांना घेऊन जिल्हाधिकारी श्री. राजा दयानिधी यांच्याशी प्रश्नाच्या सोडवणूकीबाबत सविस्तर चर्चा केली. मांगलेचे सरपंच प्रल्हाद पाटील, माजी उपसरपंच संदीप तडाखे, जालिंदर तडाखे, दत्तात्रय तडाखे, निवृत्ती तडाखे, अशोक तडाखे, वसंत तडाखे, दीपक तडाखे, विनोद जगताप, संतोष तडाखे, विलास तडाखे, लक्ष्मण तडाखे, काकासो तडाखे, शंकर समिंद्रे, प्रविण तडाखे आदी उपस्थित होते.





Comments