सागाव (ता. शिराळा) येथून वाहणाऱ्या वारणा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी लोहार गल्ली-स्मशानभूमी रस्ता व सागाव ते सरुड रस्त्यावर आले आहे.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


सागाव (ता. शिराळा) येथून वाहणाऱ्या वारणा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी लोहार गल्ली-स्मशानभूमी रस्ता व सागाव ते सरुड रस्त्यावर आले आहे. सागाव ते सरुड दरम्यानच्या वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. सागावमधील बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. या पूर परिस्थितीची पाहणी आज केली. नागरीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी वारणा बँकेचे संचालक बळीदाजी पाटील, ‘विश्वास’चे संचालक बाबासो पाटील, माजी सरपंच तात्यासो पाटील, माजी जि. प. सदस्य जगन्नाथ लोहार, बाजार समिती संचालक संग्राम पवार, उदय पाटील, मंदार चौगुले, दत्तात्रय तानवडे, जयंत शेटे आदी मान्यवर व ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.



Comments