सामाजिक सभागृह व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन सोहळा
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read


मणदूर पैकी सिद्धेश्वरवाडी (ता. शिराळा) येथील नवीन वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व कुदळ मारून करण्यात आले. ग्रामस्थांमार्फत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सभामंडपास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार माजी राज्यमंत्री श्री. नाईक व आमदार श्री. मानसिंगभाऊ यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगाने मान्यवरांसह कांही मंडळींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, उपसभापती एन. डी. लोहार, माजी सरपंच वसंत पाटील, सावळा पाटील, शंकर मोहिते, गुढेचे सरपंच प्रकाश जाधव, माजी उपसरपंच दगडू कदम, जी. के. पाटील, पांडुरंग पाटील, मच्छिंद्र माने, मारुती पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, बबन पवार, राम कांबळे, पांडुरंग कांबळे, मच्छिंद्र पाटील, अंतू पाटील, शिवाजी मिरुखे, रामचंद्र जाधव, रामचंद्र मिरुखे, नामदेव मिरुखे, बुवा नारायण मिरुखे, बाबूराव डोईफोडे, भागोजी डोईफोडे, बबन डोईफोडे, दगडू कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments