"निगडीतील ‘हॉटेल आनंदवन’चा भव्य शुभारंभ: वसंत आणि अविनाश साळुंखे यांच्या नवीन व्यवसायाची सुरूवात"
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 1 min read

निगडी (ता. शिराळा) गावचे वसंत साळुंखे व अविनाश साळुंखे यांनी ‘हॉटेल आनंदवन’ या नवीन व्यवसायाची सुरवात केली आहे. त्याचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते फीत झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी वसंत व अविनाश साळुंखे यांना शुभेच्छा दिल्या. निगडीचे सरपंच गणपती भालेकर, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक प्रणव पाटील, माजी संचालक आनंदराव यादव, पद्माजी साळुंखे, महेश साळुंखे, संदीप भालेकर, सचिन गलुगडे, जयदेव भालेकर, पाडळीचे सागर पाटील, संभाजी पाटील, सागर पाटील आदी मान्यवर व युवक उपस्थित होते.



Comments